पाकिस्तानी महिलेने टेडी बिअरसोबत थाटला संसार , पतीपेक्षा देखील तो ..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या पाकिस्तान येथील एका महिलेची जोरदार चर्चा असून तिने तिच्या पतीच्या निधनानंतर चक्क टेडी बियरसोबत लग्न केलेले आहे. गेल्या दहा वर्षांपासून आपण टेडी बियर याच्यासोबत राहत असून त्याच्यामुळे आपल्याला पती नाही ही जाणीव होत नाही असे म्हटलेले आहे. तिच्या अजब प्रेम कहानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून त्यामध्ये तिने अनेक रहस्य उलगडलेली आहेत .

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती तिचे प्रेम आणि वैवाहिक आयुष्य याबद्दल बिनधास्तपणे बोलत असून टेडी बियरवर आपण इतके प्रेम का करतो याविषयी देखील अनेक खुलासे केलेले आहेत.

महिला म्हणते की, टेडी बियर हा तिचा पार्टनर आहे आणि ती सर्व गोष्टी त्याच्यासोबत शेअर करते. आपल्या आत्तापर्यंतच्या यशाचे क्रेडिट देखील या टेडी बियरला ती देत असून टेडी बियर तिची प्रत्येक गोष्ट ऐकतो तिला उलट उत्तर काहीही देत नाही त्यामुळे तो तिच्यावर रागावत देखील नाही आणि ओरडत देखील नाही मात्र बहुतांश पती असे करतात. माझा टेडी बियर पती हा माझ्यावर कधीही रागवत नाही. सदर महिलाही व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी गाणे म्हणताना देखील दिसत असून तिची मुलाखत घेणाऱ्या पत्रकारावर देखील ही महिला एकदा भडकते हे दिसून येत आहे.


शेअर करा