‘ पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याच नाहीत ‘ , पुणे पोलिसांकडून गोदी मीडियाचा भांडाफोड

शेअर करा

जमावबंदी आदेशाचा भंग करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याच्या आरोपावरून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 41 कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला असून या आंदोलनाच्या वेळी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याचा दावा गोदी मीडियाकडून करण्यात आलेला होता मात्र बंडगार्डन पोलिसांनी या वृत्ताचे खंडन केले असून ‘ पाकिस्तान जिंदाबाद ‘ अशा कुठल्याही घोषणा देण्यात आलेल्या नाहीत असे सांगितले गेलेले आहे .

सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडिओमध्ये हा दावा करण्यात आला होता मात्र अशा व्हिडीओची विश्वासार्हता पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे देखील असाच एक व्हिडीओ काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेला होता मात्र त्यानंतर त्या व्हिडिओसोबत छेडछाड केल्याचे समोर आणले होते.

एनआयए संस्थेने २२ सप्टेंबर रोजी कोंढवा भागात छापा टाकून या कार्यकर्त्यांना अटक केली होती त्यानंतर सदर कारवाई ही गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली असून केवळ धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा केंद्र सरकारचा हा डाव आहे असे संघटनेचे म्हणणे होते. शुक्रवारी तेवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र सरकारी आदेशाचा भंग करत हा मोर्चा काढण्यात आला त्यावेळी या घोषणा दिल्या गेल्या असे वृत्त आणि काही व्हिडीओ व्हायरल झालेले होते .

परवानगी नसताना मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी 41 जणांना ताब्यात घेतले असून आंदोलनाच्या वेळी काही जणांनी ‘ पाकिस्तान जिंदाबाद ‘ अशा घोषणा दिल्या असा दावा करण्यात आला होता मात्र पोलिसांनी या वृत्ताचे खंडन केले असून गोदी मीडियाचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे .


शेअर करा