पीएफआयशी संबंधित दोन जण नगरमध्ये ताब्यात , कोर्टात हजर केल्यावर ..

शेअर करा

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात अटकसत्र राबविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दोन जणांना स्थानिक पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले असून तब्बल 11 राज्यांमध्ये हे छापा सत्र सुरू आहे. आत्तापर्यंत 106 जणांना अटक करण्यात आलेले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचाही तपास सुरू आहे.

नगर शहर आणि संगमनेर येथून या दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी लेखी हमी दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आलेले आहे. अहमदनगर स्थानिक पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणेने ही कारवाई केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर यापुढे दखलपात्र आणि अदखलपात्र अशा स्वरूपाचे कुठलेही गुन्हे करणार नाही आणि कायदा-सुव्यवस्थेचे पालन करेल अशी हमी दिल्यानंतर न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे.

जुबेर अब्दुल सत्तार शेख ( वय 38 राहणार गोविंदपुरा मुकुंदनगर ) आणि मौलाना अहमद खलील दिलावर शेख ( राहणार संगमनेर ) अशी ताब्यात घेतलेल्या घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. जुबेर हा नगर जिल्ह्यात संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत होता. सत्तावीस तारखेला पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले तर सोबतच संगमनेर येथील मौलाना खलील दिलावर शेख याला देखील ताब्यात घेण्यात आले होते.


शेअर करा