
पुण्यात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून लोणीकंद परिसरात एका महिलेला मालिश करून देतो असे सांगत तिच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले आहे. सदर महिलेला मानेचा आजार असल्याने मालिश करून घेण्यासाठी ती योग्य व्यक्तीचा शोध घेत होती त्याच दरम्यान आरोपीने तिला हेरले आणि तिचे मंगळसूत्र गायब केले.
उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि तिची आई या आव्हाळवाडी येथील रहिवासी असून त्यांच्या घरी एक अनोळखी व्यक्ती आला होता त्यावेळी त्याने आपण चांगला मसाज करतो. मानेचे आणि कमरेचे दुखणे बरे होईल असे देखील त्याने सांगितले त्यावेळी फिर्यादी यांच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आणि समोरील व्यक्तीने मसाज करतेवेळी गळ्यातील दागिने काढून ठेवा असे सांगितले. महिलेने हे दागिने काढून ठेवले मात्र दरम्यानच्या काळात या चोरट्यांने अडीच तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन तिथून पळ काढला.
पुण्यात याआधी देखील अशाच स्वरूपाने साड्या बक्षीस मिळवून देतो, पाठीमागून पोलीस येत आहेत, आम्ही पोलिस आहोत असे सांगत वेगवेगळ्या पद्धतीने शक्कल लढवून नागरिकांना फसवले आहे. भीती दाखवून घाबरून पैसे लुटण्याचा धंदा पुण्यात असून नागरिकांनी येत्या काळात सजग राहण्याची गरज आहे.