
पुणे शहरात माथाडी नावाचा वापर करून व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी मागणारा रवींद्र ससाने याच्यासोबत इतर तीन जणांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका कारवाई करण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात माथाडी कामगारांच्या नावाचा वापर करून उद्योजकांकडून खंडणी उकळण्याचे प्रकार समोर आलेले होते त्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारांवर बंदी घालण्यासाठी कंबर कसलेली पाहायला मिळत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, रवींद्र जयप्रकाश ससाने ( वय 49 राहणार विमाननगर ), मंगल रमेश सातपुते ( वय 40 राहणार धानोरी ) आणि दीपक संपत गायकवाड ( वय 40 राहणार येरवडा ) अशी कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे असून सदर व्यक्ती यांनी फिनिक्स मॉलमध्ये कामासाठी मटेरियल आल्यानंतर व्यावसायिकाला खंडणी मागितली होती त्यानंतर त्यांनी दोन लाख रुपयांची खंडणी चक्क चेकच्या माध्यमातून देखील स्वीकारल्याचे समोर आलेले होते.
पुणे शहरात आल्यानंतर नवीन उद्योजकांना स्थानिक गुंडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सहन करावा लागतो अशी अनेक प्रकरणे याआधी देखील समोर आलेली असून सध्याचे प्रकरण हे माथाडींच्या नावाने धमकावून खंडणी घेण्यात आल्याचे आहे. आरोपी ससाने हा या टोळीचा प्रमुख असून त्याचे साथीदार गायकवाड आणि सातपुते यांच्यावर देखील याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी मकोका कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला होता त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे.