पुन्हा पुण्यात एक ‘ वेगळंच ‘ आंदोलन , पोलिसांनी काढून दिलं तिकट

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत असून पुण्यातील हा व्हिडिओ आहे. पुण्यातील अलका चौकात एका युवकाने ट्राफिक पोलिसांनी पकडल्यानंतर अनोख्या स्वरूपाने आंदोलन केले आहे. रस्त्यावर झोपून अभ्यास करत त्याने पोलिसांचा निषेध व्यक्त केलेला असून त्याच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची पुण्यात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर युवक हा एमपीएससीचा अभ्यास पुण्यात राहून करतो. रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना अलका टॉकीज चौकात पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याला दंड भरायला सांगितला. विद्यार्थ्याने त्यावेळी ‘ आपण सहा महिन्यातून पहिल्यांदा गावाकडे जात आहे. माझी रेल्वे सुटेल मला जाऊ द्या ‘ असे सांगत त्यांना विनंती केली मात्र पोलिसांनी त्याला तिथेच बसवले त्यानंतर रेल्वेची वेळ निघून गेल्यानंतर त्याने रस्त्यावरच ठिय्या मांडला आणि पोलिसांच्या समोरच रस्त्यावर झोपून अभ्यास करू लागला.

‘ वाहतूक पोलिसांना आपण सर्व कागदपत्रे दाखवले मात्र पोलिसांकडून म्हणून मुद्दाम अडवणूक केली गेली ‘ असा दावा या तरुणाने केलेला असून वेळेत सोडलं नाही म्हणून आपलं नुकसान झालेले आहे असे म्हणत त्याने रस्त्यावरच ठिय्या मांडून अभ्यास करत आपला निषेध व्यक्त केला. पोलिसांनी अडवल्यामुळे गावाकडे जाणारी आपली रेल्वे चुकली असे म्हणत गांधीगिरी करत या तरुणाने रस्त्यावरच ठिय्या मांडलेला होता. अखेर पोलिसांनी खाजगी ट्रॅव्हल बसमध्ये बसून त्याला गावी पाठवण्याची व्यवस्था केली आणि सगळा खर्च हा पोलिसांनीच केला. आपला आता काहीही आक्षेप नाही असे सांगत या तरूणाने गावी जाणारी गाडी पकडली मात्र त्याच्या रस्त्यावरील आंदोलनाने पोलिसांची देखील चांगलीच तारांबळ उडाली होती.


शेअर करा