‘ पुरावे नष्ट ‘ करण्यासाठी महिलेच्या घरात पती-पत्नीचा राडा , तोफखान्यात गुन्हा

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका विवाहित महिलेला मोबाईलवरून अश्लील मेसेज पाठवण्यात आले आणि त्यानंतर मेसेज पाठवल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी तिला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. आरोपीने तिच्या घरातील मोबाईल आणि तीन लाख रुपये पळून नेले असे पीडित महिलेचे म्हणणे असून जून 2022 मध्ये ही घटना घडलेली होती. तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी पती-पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

उपलब्ध माहितीनुसार, किरण साबळे आणि मंदा साबळे अशी आरोपी पती-पत्नीची नावे असून त्यांच्या विरोधात एका 32 वर्षे महिलेने गुन्हा नोंदवलेला आहे. पीडित महिला ही पतीशी फारकत घेऊन एकटी राहत असून तिची आरोपी किरण साबळे याच्यासोबत ओळख झालेली होती. गेल्या काही वर्षांपासून तो सातत्याने तिला फोनवर त्रास देत होता त्यामुळे अखेर वैतागून तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक करून टाकला. मोबाईल नंबर ब्लॉक झाल्याचे समजतात त्याने दुसऱ्या नंबरवरून तिला मेसेज पाठवण्यास सुरुवात केली त्याने ती हैराण झालेली होती .

आपल्या मेसेजला ती काहीही प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने रस्त्याने तिला अडवले आणि तिचे काही व्हिडिओ आपण बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू अशी देखील धमकी देण्यास सुरु केले. तिची बदनामी केली गेल्याचे पुरावे तिच्या मोबाईलमध्ये मेसेजच्या स्वरूपात असल्याने हे पुरावे नष्ट व्हावे म्हणून तो तिला धमकावण्यास देखील त्याने सुरू केलेली होती. सदर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी याने त्याच्या पत्नीला सोबत घेऊन जून 2022 मध्ये तिचे घर गाठले आणि तिला घरात घुसून मारहाण केली. तिचा मोबाईल हिसकावून घेतला आणि घरात ठेवलेले तीन लाख रुपये देखील त्यांनी नेले असे पीडित महिलेचे म्हणणे आहे . तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलेली आहे.


शेअर करा