‘ पृथ्वीतलावर दोनच प्रेमी जन्माला आले एक शहाजहान अन दुसरा मी ‘

शेअर करा

देशात सध्या बेताल बोलणाऱ्यांची फौज असून महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळाच्या आरोपानंतर वादात अडकलेले भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी स्वतःची तुलना चक्क मुघल बादशाह शाहजहाँसोबत केलेली असून केलेली असून 15 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रेनंतर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, , ‘ पृथ्वीतलावर दोनच प्रेमी जन्माला आले त्यामध्ये एक शहाजहान आणि दुसरा ब्रिजभूषण शरण सिंह . शहाजहानने ताजमहल बनवला आणि मी नंदिनी नगर ‘. नंदिनीनगर हे नाव कसे पडले यावर वेगवेगळ्या चर्चा परिसरात असून काही जणांनी हे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या आईचे नाव असल्याचे म्हटले आहे तर काही जणांनी हे नाव त्यांच्या मुलीचे असल्याचे देखील म्हटलेले आहे तर काहीजणांनी चक्क ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या एका प्रेयसीचे हे नाव आहे असेही म्हटलेले आहे .

ब्रिजभूषण शरणसिंह पुढे म्हणाले की , ‘ भारताच्या फाळणीला पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जबाबदार आहेत. नेहरूंच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची फाळणी झाली. भारत पाकिस्तान युद्ध झालं तेव्हा जिंकलेला भाग देखील नेहरुंनी पाकिस्तानला परत केला. परराष्ट्र सुरक्षा सल्लागाराच्या सांगण्यावरून लष्कर देखील मागे घेतले ‘, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची तोंड भरून स्तुती केलेली आहे.


शेअर करा