‘ पे गौतम ‘ , क्यू आर कोडमध्ये चक्क दिसत आहेत मोदी

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावरून देशात एकच चर्चा सुरू झालेली असून मी जास्त काही शिकलेलो नाही असे खुद्द पंतप्रधान मोदी यांनी एकदा म्हटलेले होते. तो व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल होत आहे तर दुसरीकडे मोदी यांचे डिग्री प्रकरण सध्या चर्चेत आहे . मोदी यांच्या डिग्रीत वापरलेला फॉन्ट देखील डिग्री दिल्यानंतरच्या पाच वर्षांचा आहे त्यामुळे सोशल मीडियात डिग्री खरी कि खोटी या विषयावर चर्चा सुरू आहे.

झारखंड युथ काँग्रेसने या प्रकरणी एक फेसबुक पोस्ट टाकलेली असून त्यामध्ये एक व्यंगचित्र शेअर केलेले आहे. काँग्रेसने शेअर केलेल्या व्यंगचित्रांमध्ये ‘ मदारी चाहे अनपढ हो लेकिन पढे लिखो से ताली बजवा सकता है और अंत में झोला उठाकर चल देता है ‘ असे म्हटलेले आहे. एका चित्रांमध्ये एक मदारी दोन जणांना नाचवताना दिसत असून युथ काँग्रेसच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे तर आणखीन एका पोस्ट मध्ये पेटीएम सोबत साधर्म्य असलेल्या क्यू आर कोड मध्ये मोदी यांचा फोटो लावून ‘ पे गौतम ‘ असे देखील लिहलेले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी एका भाषणामध्ये ,’ मी फकीर आहे माझे कुणी काही बिघडवू शकत नाही वेळ पडली तर मी झोला उठून निघून जाईल ‘, असे म्हटलेले होते त्यांच्या या वाक्याचा संदर्भ देत झारखंड युथ काँग्रेसने ही पोस्ट टाकलेली आहे तर गौतम अडाणी यांच्या कंपनीतील २० हजार कोटी कुणाचे आहेत यावर देखील काँग्रेसने अनेकदा हल्लाबोल केलेला आहे .


शेअर करा