पोलिसांच्या खंडणीखोरीला वैतागून आत्महत्या ? कुटुंबाकडून आत्मदहनाचा इशारा

शेअर करा

काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात एका सुवर्णकार व्यक्तीने आत्महत्या केलेली होती. सदर व्यक्ती यांचे गोल्डन ज्वेलरीचे दुकान असून त्यांच्या दुकानात एका व्यक्तीने चोरीचा काही माल आणून विकलेला होता त्यानंतर हा माल विकत घेणारे सुवर्णकार व्यावसायिक दीपक दुसाने यांनी आत्महत्या केली आणि या प्रकरणात पोलिसांनी देखील त्यांना खूप त्रास दिला असल्याचे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. दीपक दुसाने यांची आत्महत्या करण्यापूर्वीची व्हिडिओ क्लिप आता हाती लागलेली असून त्यानंतर संबंधित पोलिसांवर देखील तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आता नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. ओबीसी सुवर्णकार समाजाचे प्रदेशाध्यक्ष गजू घोडके यांनी यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

गजू घोडके यांनी शासकीय विश्रामगृह नाशिक येथे पत्रकार परिषदेत घेतली त्यावेळी, ‘ मयत दीपक दुसाने यांनी गळफास लावून आत्महत्या केली त्याआधी पोलिसांनी त्यांच्यावर चोरीचे सोने खरेदी केल्याचा ठपका ठेवलेला होता. सदर प्रकरणात खोट्या केसेस दाखल करून त्यांना अडकवण्याची भीती दाखवत त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 370,000 रुपयाची खंडणी देखील उकळली असे देखील कुटुंबियांचे म्हणणे आहे. सदर जाचाला कंटाळून दुसाने यांनी आत्महत्या केली त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा. दुसाने यांच्या मोबाईलमध्ये आत्महत्या करण्यापूर्वीची व्हिडिओ क्लिप हाती लागलेली असून त्यामध्ये पोलिसांच्या खंडणीखोरपणाचा प्रकार समोर आलेला आहे. संबंधित पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आत्मदहनाचा आम्हाला पवित्रा घ्यावा लागेल असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.

नाशिक येथील जेलरोड परिसरात जुना सायखेडा रस्त्यावर लोखंडे मळा येथे राहणारे सराफ व्यावसायिक दीपक कमलाकर दुसाने ( वय 29 ) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती . पोलिसांनी त्यांच्या विरोधात चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी काही सोने जप्त केलेले होते. नाशिक रोड येथील जुन्या पुलाखाली दीपक दुसाने यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात कारवाई केली आणि त्यांच्याकडून काही सोने होते जप्त केलेले होते. उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांच्या त्रासाला वैतागून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केलेला आहे.


शेअर करा