पोलिसांना म्हणाले ‘ मामा पाय पुढे करा आशीर्वाद द्या ‘ , परीक्षा केंद्रावरच प्रथम भेटले अन..

शेअर करा

कधी कुठे कुणाला कोणाबद्दल कसे प्रेम निर्माण होईल याचा काही भरवसा राहिलेला नाही असेच एक प्रकरण सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून एक मुलगी परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली होती त्यावेळी तिने ती तिथे आलेल्या एका तरुणाच्या पहिल्या नजरेतच त्याच्या प्रेमात पडली त्यानंतर त्याच्यासोबतच लग्न करायचे असे देखील तिने घरी सांगितले. त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाल्यावर घरातून विरोध झाला मात्र अखेर त्यांचा विवाह पार पडलेला आहे. बिहार येथील कटिहार येथील हे प्रकरण आहे .

उपलब्ध माहितीनुसार, नितीश आणि गौरी अशी असे या दाम्पत्याचे नाव असून एका परीक्षा केंद्रावर त्यांची सर्वप्रथम भेट झाली होती. एक अज्ञात कॉल आला आणि त्यानंतर ते एकमेकांसोबत बोलायला सुरु झाले त्यानंतर त्यांनी परीक्षेचे केंद्र निवडताना त्यांनी एकच केंद्र निवडले त्यावेळी ते दोघे सर्वप्रथम तिथे भेटले. दोघांनीही एकमेकांना पाहिल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आमचे लग्न इथेच लावून द्या असे देखील त्यांनी घरच्यांना सांगितले .

दोघांच्याही घरातून या प्रकाराला जोरदार विरोध झाला. कुटुंबीयांनी तिथे दाखल होत लग्नाला विरोध केला आणि पोलिसही तिथे दाखल झाले. नितीश आणि गौरी हे दोघेही सज्ञान होते त्यामुळे पोलिसांनी त्यांना सुरुवातीला पोलीस ठाण्यात नेले आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या मंदिरातच दोघांचेही लग्न लावून दिले. लग्न लावल्यानंतर त्यांनी आईवडिलांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला मात्र आईवडिलांनी त्यांना आशीर्वाद देण्यास नकार दिला म्हणून त्यांनी चक्क पोलिसांचे पाय धरले आणि पोलिसांचा आशीर्वाद घेतला .

दरम्यानच्या या प्रकारात त्यांची परीक्षा देणे राहून गेले त्यावेळी त्यांनी आता पुढील वर्षी आम्ही परीक्षा देऊ असे देखील पोलिसांना सांगितले असून सध्याच्या परिस्थितीत दोघेही पोलिस ठाण्यातून निघून इतरत्र राहायला गेलेले आहेत. दोघांच्याही घरून त्यांना तीव्र विरोध झालेला आहे. कायद्याने सज्ञान असल्याने ते सध्या इतर एका ठिकाणी राहत असून आमचे कुटुंबीय आम्हाला काही दिवसात स्वीकार करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.


शेअर करा