पोलीस होताच बायकोचा प्रियकरासोबत घरोबा , पत्नीपीडित मिथुन म्हणतोय की ?

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची चर्चा सुरू असून प्रेमात आंधळे झालेल्या एका व्यक्तीने स्वतःच्या प्रेयसीला पोलीस दलात नोकरी हवी म्हणून पाहिजे ती मदत केली त्यानंतर त्याने चक्क स्वतःचं घर आणि जमीन देखील विकली आणि तिला पोलिसात भरती केले मात्र पोलिसात नोकरी लागल्यानंतर ही प्रेयसी झालं गेलं सगळं विसरून प्रियकराजवळ गेली त्यानंतर पिडीत तरुण हा बायकोच्या विरोधात पोलिसांकडेच न्याय मागत आहे.

बिहार येथील हे प्रकरण असून मिथुनकुमार नावाचा तरुण पोलीस भरतीची तयारी करत होता मात्र याच दरम्यान तो एका तरुणीच्या प्रेमात पडला आणि ती देखील पोलिस भरतीची तयारी करत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहण्यास सुरू केले. कुटुंबियांच्या संमतीने त्यांनी लग्न देखील केले तोपर्यंत या तरुणीची पोलिसात भरती झालेली नव्हती. आपलं आपल्या बायकोवर खूप प्रेम आहे म्हणून आपण तिच्यासाठी स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवले आणि तिच्यासाठी स्वतःची जमीन आणि राहते घर देखील विकले, असे या पतीचे म्हणणे आहे.

एका राजकीय नेत्याच्या ओळखीने आपल्या पत्नीला नोकरी मिळाली मात्र त्यानंतर तिने आपली फसवणूक केलेली असून आपल्याला सोडून दिले आहे आणि तिच्या नव्या प्रियकराच्यासोबत तिने संसार थाटलेला आहे असे या पत्नीपीडित मिथुनचे म्हणणे आहे. आपल्या बायको विरोधात आर्थिक फसवणुकीचा दावा दाखल करून घेण्यात यावा आणि तिला कठोर शिक्षा करण्यात यावी यासाठी या पतीने आता पोलिसात धाव घेतली आहे.


शेअर करा