प्रियकरासोबत ‘ झोका ‘ घेताना दिसली म्हणून दिल्लीहून पती आला तर..

शेअर करा

सोशल मीडियावर एका अनैतिक संबंधाच्या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून त्यातून एका व्यक्तीला ऍडमिट करण्याची वेळ आली आहे. महिलेचा पती हा कामानिमित्त इतरत्र गेलेला होता आणि त्यानंतर त्याच्या पत्नीचे दुसरीकडे प्रेम संबंध जुळले. सदर पत्नी ही तिच्या प्रियकरासोबत एका गार्डनमध्ये झोका खेळत असतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हाट्सअपवर तिच्या पतीला पाठवला. पती धावत पळत दिल्ली येथून नवादा येथे आला त्यानंतर पत्नीनेच त्याला बेदम मारहाण केली म्हणून त्याची दवाखान्यात रवानगी करण्यात आलेली आहे.

बिहारच्या नवादा येथील हे प्रकरण असून सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलेली आहे. जखमी पतीला त्याची पत्नी प्रियकरासोबत झोका खेळत असल्याचा व्हिडिओ व्हाट्सअप वर आलेला होता. ते पाहून आपल्या पत्नीने आपल्याला धोका दिलेला आहे हे लक्षात आल्यावर त्याने तिला जाब विचारला मात्र तिने प्रियकराला सोबत घेत त्यालाच बेदम मारहाण केली.

जखमी झालेल्या पतीने या प्रकरणी बोलताना आमचं लग्न 2014 मध्ये झालेलं होतं त्यानंतर मी दिल्लीमध्ये काम करत होतो त्यावेळी मी घरी नसताना माझा मित्र किरण मिस्त्री हा माझ्या घरी जा ये करायचा. काही कालावधीतच प्रेयसी आणि प्रियकरासारखे वागू लागले आणि सोबतही फिरायला जाऊ लागले याच दरम्यान एका जागरूक नागरिकाने त्यांचा व्हिडिओ काढला आणि तो मला पाठवला त्यावर मी माझा संताप व्यक्त केला तर तिनेच मला मारहाण केली, असे म्हटलेले आहे.

प्रियकर पुढे म्हणतो की, मला आता समजत नाही ही तक्रार तरी कुणाकडे करावी. जिच्यासोबत सात जन्म राहण्याचे आश्वासन दिलेलं होतं तिनेच दगा दिलेला आहे. तिच्याकडून भविष्यात देखील कुठलाही घातपात होण्याची शक्यता असून आपण पोलीस संरक्षणाची मागणी केलेली आहे, ‘ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा