प्रियकरासोबत मिळून पत्नीने बनवला होता ‘ मास्टरप्लॅन ‘ पण..

शेअर करा

प्रियकरासोबत मिळून

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून शेतावर पहारेकर्‍याचे काम करणाऱ्या व्यक्तीची त्याच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे. आपल्या पतीचा खून केल्यानंतर तिने पतीने आत्महत्या केली असे भासवण्याचा देखील प्रयत्न केला मात्र तिचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

अकोला येथील हे प्रकरण असून पोलिसांना एका विहिरीमध्ये बंडू ठाकूर नावाच्या एका तरुणाचा मृतदेह सापडला होता. ज्या दिवशी तो गायब झाला त्यादिवशी त्याच्या पत्नीने फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस तपास सुरू असतानाच त्याचा मृतदेह विहिरीत आढळला त्यावेळी त्याने आत्महत्या केली असावी अशी शंका पत्नी व्यक्त केली मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली त्यावेळी गुप्त सूत्रांच्या माध्यमातून बंडू यांच्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समोर आले. बंडू हा एका शेतात पहारेकर्‍यांची काम करायचा त्यावेळी त्याच्या पत्नीचे श्याम खुले नावाच्या जमीन मालकासोबत प्रेमसंबंध जुळले होते. पतीचा खून करून प्रियकरासोबत लग्न करण्याची स्वप्ने ही पत्नी रंगवत होती मात्र पोलिसांनी तिचा हा बनाव म्हणून पाडलेला आहे.


शेअर करा