प्रेयसीने लग्न म्हणताच अमानुषतेची पातळी ओलांडली , पहा व्हिडीओ

शेअर करा

लग्नाआधीचे प्रेम संबंध हे काही नवीन राहिलेले नाहीत मात्र लग्नाआधी प्रेम संबंध ठेवल्यानंतर तरुणींकडून लग्नाची विचारणा सुरू होताच अनेक तरुण लग्नाला नकार देतात आणि त्यातून वाद होतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून लग्नासाठी प्रेयसीने विचारणा केली म्हणून या प्रियकराने चक्क तिला बेदम मारहाण केलेली आहे. तरुणी बेशुद्ध पडलेली असून एका व्यक्तीने हा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकून दिला.

सदर तरुणी ही 19 वर्षांची असून ही घटना बुधवारी उघडकीला आलेली आहे याआधी देखील या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असल्याने त्याला सोडून देण्यात आले आणि त्यानंतर त्याने तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार केला. पोलिसांनी त्याच्या विरोधात दुसऱ्यांदा गुन्हा दाखल केला असून गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला आहे. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील मौगज येथील हे प्रकरण असून व्हिडिओमध्ये प्रियकर आणि प्रेयसी एका निर्जन स्थळी उभे असल्याचे दिसून येत आहे एक व्यक्ती त्यांचा दुरून व्हिडिओ बनवत आहे हा सर्व प्रकार आरोपी तरुणाला देखील माहिती असल्याचे दिसत आहे. आरोपी तरुण दुसऱ्या आरोपीला व्हिडिओ बनवण्यास सांगत आहे असे देखील दिसून येत आहे त्यानंतर प्रेयसी त्याला लग्न करण्यासाठी विचारते आणि त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू होतात.

वाद सुरू झाल्यानंतर प्रियकर व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला रेकॉर्डिंग बंद करायला सांगतो आणि त्यानंतर प्रेयसीच्या जोरदार कानाखाली मारतो. तिला जमिनीवर पडून तिच्या पायाला लाथ मारतो मात्र त्यानंतर तो तिच्या तोंडावर देखील लाथा मारतो. प्रेयसीच्या तोंडातून लग्न शब्द ऐकल्यानंतर त्याचा संताप अनावर होतो आणि तो तिला शिवीगाळ करून मारहाण करतो. पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.


शेअर करा