प्रेयसीला लग्नात डोळे भरून पहायचं म्हणून केला ‘ वेगळाच ‘ प्रयोग : व्हिडीओ

शेअर करा

प्रियकर प्रेयसीमध्ये प्रेम प्रकरण असते इथपर्यंत ठीक आहे मात्र एखाद्याचे लग्न जमले तर दुसऱ्याला हे पचवणे अत्यंत अवघड होते. आपल्या प्रेयसीचे लग्न पाहण्याची देखील काही व्यक्तींना सुप्त इच्छा होते मात्र असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात एका प्रियकराला चांगलाच अंगलट आलेला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झालेला असून त्याची झालेली हालत पाहून नागरिक देखील त्याच्यावर हसत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणाच्या मैत्रिणीचा विवाह होणार होता त्यामुळे तिला घरातून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. त्याने तात्काळ काहीही करून आपल्या मैत्रिणीचा विवाह पाहायचाच या आशेने चक्क स्वतःच्या अंगावर महिलांचे कपडे घातले आणि तिला भेटायला जाण्याचा प्लॅन केला. महिलांसारखी साडी देखील तो नेसला . हातात बांगड्या घातल्या आणि लांब केसांचा विग लावला आणि तो तिच्या घरी पोहोचला.

त्याचं चालणं आणि वागणं पाहून कुणालाच सुरुवातीला संशय आला नाही मात्र प्रेयसीच्या घरातील काही व्यक्तींना याविषयी कुणकून लागली आणि त्यांनी त्याला पकडले. रंगेहात पकडले गेल्यानंतर पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि त्यानंतर त्याला चोप देण्यास सुरुवात करण्यात आली त्याचा चेहरा व्हिडिओत यावा यासाठी अनेक जण धडपडत होते मात्र तो ओढणीने त्याचा चेहरा झाकून घेण्याचा प्रयत्न करत होता. उपस्थित मित्रांच्या मदतीने कसातरी तो हातातून पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला असून त्याने केलेल्या या अनोख्या प्रकाराची चर्चा सुरू झालेली आहे .


शेअर करा