प्रॉपर्टी अन सातबारा कळायच्या आतच भावाने केले घात

शेअर करा

महाराष्ट्रात एक दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यात समोर आलेली असून शेतीच्या वादातून मोठ्या भावाने चक्क आपल्या आठ वर्षाच्या लहान सावत्र भावाची अत्यंत अमानुषपणे हत्या केलेली आहे . प्रॉपर्टी काय असते संपत्ती काय असते याचे कुठलेही ज्ञान नसणाऱ्या अवघ्या आठ वर्षाच्या चिमूरड्याची त्याच्या सावत्र भावाने अखेर हत्या केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार विराज कुढेकर ( वय आठ वर्ष ) असे मयत मुलाचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केलेली आहे. जालना जिल्ह्यातील भारडी गावात शेतीच्या वादातून हा प्रकार घडलेला असून वडिलोपार्जित जमीन सावत्र भावाच्या नावावर न करता आपल्या नावावर करावी म्हणून आरोपी हा सतत त्याच्या सावत्र आईला धमकावत होता. त्यांच्यात वाद झाल्यानंतर अखेर आरोपीने सावत्र भाऊ असलेला विराज याला शेतात घेऊन जात रुमालाने गळा दाबून त्याचा जीव घेतला. गोंदी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याने हत्येची कबुली दिलेली आहे .

ऋषिकेश तुकाराम कुढेकर व रेखा तुकाराम कुढेकर (रा. रांजणगाव, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावं असून पहिल्या पत्नीचा मुलगा असलेल्या ऋषिकेश याला दोन एकर जमीन नावावर करून पाहिजे होती. त्यामुळे जमीन माझ्या नावावर करून द्या यासाठी तो सतत वडिलांना सांगायचा. मात्र दोन्ही मुलांना समान वाटा म्हणत तुकाराम कुढेकर हे एक एकर जमीन नावावर करून देण्यास तयार होते मात्र एक एकर जमीन ऋषिकेशच्या आईला मान्य नव्हती. त्यामुळे तू जर विराजला संपवलं तर सर्व जमिनीचा मालक होशील, असे ऋषिकेशला त्याच्या आईने सांगितल होत त्यातून त्याने हा प्रकार केला.


शेअर करा