प्रोमोशन नको फक्त ‘ इतकंच ‘ करा , सांगूनही फरक नाही अन त्यानंतर..

शेअर करा

देशात एक खळबळजनक असे प्रकरण चंडीगड येथे समोर आलेले असून कृषी विभागाच्या एका कर्मचाऱ्याने राज्य सचिवालयाच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे. मनदीप कुमार ( वय 39 ) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून बदली झाल्यामुळे ते अस्वस्थ झालेले होते.

आपली बदली टाळावी यासाठी ते कृषी विभागातील वरिष्ठांना भेटण्यासाठी सचिवालयात आलेले होते मात्र त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही त्यामुळे अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. नवव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते मात्र त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडलेली असून अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्यांनी वाढदिवस देखील साजरा केलेला होता.

बदली झाल्यानंतर त्याला पदोन्नती देखील मिळालेली होती त्यानंतर नवीन नियुक्तीचे आदेश आले आणि त्यानंतर ते नैराश्यात गेले. आपल्याला पदोन्नती नको मात्र आपली बदली रद्द करा यासाठी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवले मात्र त्यांचे म्हणणे कोणीही ऐकून घेतले नाही. त्यांच्या पाठीमागे त्यांची आई पत्नी आणि दोन मुले असून यानंतर त्यांच्यावर शोककळा पसरलेली आहे.


शेअर करा