फुटबॉल परत मागण्यासाठी महिलांकडे पाहत ‘ आक्षेपार्ह ‘ शब्द , पोलिसावर गुन्हा दाखल

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या औरंगाबाद येथील एका पोलीस कर्मचाऱ्याची जोरदार चर्चा असून मद्यधुंद अवस्थेत त्यांनी महिलांच्या घरावर फुटबॉल फेकून मारला आणि त्यानंतर त्यांच्याकडे अश्लील नजरेने पहात त्यांना फुटबॉल परत मागण्याच्या बहाण्याने शिवीगाळ केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर आहे. औरंगाबाद येथील जवाहर कॉलनी भागात मयूरबन सोसायटी हा प्रकार समोर आलेला आहे . धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर कारवाईसाठी कॉलनीतील अनेक महिलांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलेला होता त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

अनिल बोडले ( वय ५४ मयूरबन सोसायटी ) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून महिलांच्या म्हणण्याप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी ते दारू पिऊन कॉलनीत आलेले होते आणि त्यानंतर त्यांनी परिसरातील महिलांच्या घरावर फुटबॉल फेकून मारले. महिला बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे अश्लील नजरेने पाहत ‘ बॉल दे ‘ असे अश्लील पद्धतीने ते बोलले. आरोपीने इतर महिलांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली आणि महिलांनी त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केले.

अनिल बोडले यांचे वर्तन पाहून परिसरातील महिला घाबरून गेल्या आणि त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाणे गाठले. सुरुवातीला पोलीस याप्रकरणी तक्रार दाखल करून घेत नव्हते मात्र दरम्यान या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आणि पोलीस कर्मचाऱ्याचा हा कारनामा समोर आला. याआधी देखील सदर व्यक्तीला सोसायटीच्या कार्यालयाकडून नोटीस दिली गेली होती असे देखील महिलांनी म्हटलेले आहे. विशाल ढुमे प्रकरण सध्या औरंगाबादमध्ये चांगलेच चर्चेत असताना असा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे


शेअर करा