फेविक्विकचा वापर करून प्रेमीयुगुलाची हत्या

शेअर करा

murder with feviquick

फेविक्विकचा वापर करून हत्या करण्यात आल्याचे दुर्मिळ प्रकरण सध्या चर्चेत आलेले आहे . राजस्थानातील उदयपूर इथे हे दुहेरी हत्याकांड घडले असून एका तांत्रिक व्यक्तीने फेविक्विकचा वापर करून दोन जणांची हत्या केलेली आहे. दोन्ही व्यक्तींचे मृतदेह अर्धनग्न अवस्थेत जंगलात सापडले आणि त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

उपलब्ध माहितीनुसार , भालेश कुमार असे या व्यक्तीचे नाव असून राहुल मीना आणि सोनू कुंवर असे मयत व्यक्तीचे नाव आहे. राहुल हा शिक्षक असून त्याची प्रेयसी सोनू ही अठ्ठावीस वर्षांची तरुणी होती. दोघेही विवाहित असून त्यांचे एकमेकासोबत प्रेमसंबंध होते. आरोपी भालेश कुमार याने राहुल आणि सोनी यांना फोन करून एका ठिकाणी बोलावून घेतले आणि त्यानंतर त्यांना जंगलात घेऊन गेला.

तांत्रिकाच्या आहारी गेलेले हे प्रेमीयुगुल तो जे सांगेल ते डोळे झाकून ऐकत होते त्यामुळे तांत्रिकाने कायमस्वरूपी तुम्हाला एकमेकांची साथ हवी असेल तर मी सांगतो तसे करा असे सांगितले. त्याने दोघांना हि विवस्त्र होण्यास सांगितले आणि तांत्रिकाच्या समोरच शरीरसंबंध ठेवण्यास देखील सांगितले.सदर प्रेमीयुगुल हे तो सांगेल ते ऐकत होते त्याचा फायदा घेऊन भालेश याने पन्नास फेविक्विक पॅकेट फोडलेले लिक्विड एका बॉटलमध्ये जमा केले होते ते या प्रेमीयुगुलाच्या अंगावर फेकले आणि ते काही क्षणात एकमेकांना चिटकून गेले. बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्यात त्यांची चामडी सोलली गेली मात्र या तांत्रिकाला दया आली नाही.

आरोपी तांत्रिक याने त्याचवेळी त्यांच्यावर दगडाने आणि चाकूने हल्ला केला. त्यांच्या गुप्तांगावर सपासप वार केले आणि त्यांचा खून केला सदर प्रकरण पोलिसात गेल्यावर पोलिसांनी मयत व्यक्तींची ओळख पटवली. तब्बल दोनशे जणांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटली आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले.

सोनू हिच्यावर तांत्रिकाची नजर होती तर राहुलचे लग्न झाल्यावरही सोनू हिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध होते हे या तांत्रिकाला डोळ्यात खुपत होते. अशातच राहुलची पत्नी हिने तांत्रिक व्यक्तीला काहीही करून त्यांच्यातील प्रेमसंबंध बंद झाले पाहिजे असे सांगितले होते त्यामुळे या तांत्रिकाने सोनू जर आपल्याला भेटणार नाही तर तिला मारून टाकावे तसेच राहुल याचा देखील खून करावा असा प्लॅन केला. दुसरीकडे याचा दुसरीकडे भालेश याच्या या तांत्रिक कारनाम्याचा पर्दाफाश करण्याचा देखील इशारा राहुल आणि सोनू यांनी दिलेला होता त्यामुळे त्याने हा सर्व प्रकार केला.


शेअर करा