फेसबुक लाईव्ह करत केला आयुष्याचा शेवट , प्रेयसी म्हणाली की..

शेअर करा

प्रेमप्रकरणातून एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आली असून एका तरुणाने आपल्या मैत्रिणीने आपल्याला लग्न करण्यास नकार दिल्यानंतर फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली आहे. मयत तरुणाचे वय सत्तावीस वर्ष असून त्याच्या कुटुंबीयांनी या तरुणाच्या गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप केले आहेत . सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जयदीप रॉय असे या तरुणाचे नाव असून तो आसामच्या सिलचर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याचे कुटुंबीय त्याच्यापासून दूर राहत असून याच दरम्यान त्याचे एका मुलीवर प्रेम जडले त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले त्यानंतर त्याने या मुलीला लग्नाची मागणी घातली मात्र तिने त्याला स्पष्टपणे नकार दिला. जयदीप हा वैद्यकीय उपकरणे व्यावसायिक असून त्याच्या खांद्यावर कुटुंबाची भिस्त होती त्यामुळे त्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

फेसबुक लाईव्ह मध्ये तो म्हणाला की, ‘ मी जिला लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता तिने सर्वांच्या समोर मला नकार दिला. तिच्या काकाने तिच्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधवरून मला जिवे मारण्याची धमकी दिली. माझ्यामुळे तिला कुठलाही त्रास सहन करावा लागू नये म्हणून मी आता जग सोडून जात आहे. मी माझी आई काका काकु बहीण मोठा भाऊ यांची माफी मागत असून मी तुमच्या सर्वांवर प्रेम करतो पण माझ्या मैत्रिणीवर देखील मी जास्त प्रेम होतं . तिच्याशिवाय मी जगू शकत नाही असे म्हणत त्याने फेसबुक लाईव्ह गळफास घेतलेला आहे.’ त्याच्या मित्रांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याच्याकडे धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता.


शेअर करा