‘ बंधने घालत होता ‘, वाघोलीत प्रेयसीचे प्रियकरावर सपासप वार अन..

शेअर करा

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील वाघोली परिसरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या एका प्रेयसीने तिच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून केलेला होता त्यानंतर तिने स्वतःची देखील नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तिचे प्राण वाचवण्यात आलेले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली होती . पोलिसांनी आता तरुणीची प्रकृती सुधारल्यानंतर तिला अटक केलेली असून या घटनेनंतर वाघोलीत चांगलीच खळबळ उडाली होती.

उपलब्ध माहितीनुसार, यशवंत अशोक मुंडे ( वय 22 राहणार वाघोली मूळ राहणार लातूर ) असे मयत तरुणाचे नाव असून त्याची प्रेयसी असलेली अनुजा महेश पन्हाळे ( वय 21 राहणार वाघोली मूळ राहणार कोल्हार अहमदनगर ) असे आरोपी प्रेयसीचे नाव आहे. वाघोलीतील एका महाविद्यालयात दोघेही कॉम्प्युटर सायन्स शिकत होते याचदरम्यान त्यांचे प्रेम संबंध जुळले आणि त्यांनी चक्क सोबत राहायला सुरुवात केलेली होती. सदर प्रकाराची घरच्यांना देखील कल्पना असल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.

अनुजा आणि यशवंत यांच्या गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते अन त्यानंतर त्यांनी सोबत राहायला सुरू केले मात्र यशवंत हा सातत्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि त्यातून तिला मानसिक त्रास देखील देत होता. तिच्यावर अनेक बंधने आणत होता त्यामुळे त्यांच्यात आधी देखील अनेकदा वाद झालेले होते मात्र घरच्यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते हे वाद मिटलेले देखील होते.

रविवारी रात्री अनुजा यशवंत राहत असलेल्या वसतीगृहामध्ये अभ्यासासाठी गेलेली होती त्यानंतर सोमवारी पहाटे त्यांचे जोरात भांडण झाले आणि या भांडणात संतप्त झालेली अनुजा हिने यशवंत याच्या छातीवर आणि पोटावर वार केले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालेला होता. घटना घडल्यानंतर ती घाबरून गेली आणि तिने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत तिला चक्कर येऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . प्रियकराकडून होणाऱ्या मानसिक त्रासातून तिने हा प्रकार केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलेले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार घटनेचा तपास करत आहेत.


शेअर करा