बलात्कारी बालेश धनखर याचे मोदींसोबत फोटो , भाजपशी कसे आहे राजकीय कनेक्शन ?

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या ऑस्ट्रेलियातील एका आरोपीची जोरदार चर्चा सुरू असून विशेष म्हणजे हा आरोपी भारतीय आहे आणि त्याहून कळस म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिडनी येथील हे प्रकरण असून बालेश धनखर असे आरोपीचे नाव आहे. उद्योजक म्हणून तो कार्यरत असून त्याने ड्रग्ज देऊन पाच महिलांवर बलात्कार केलेला आहे.

तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने नोकरीचे प्रलोभन लावून महिलांना ड्रग्स दिले आणि त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार केला सोबतच आरोपीने त्याचे काही व्हिडिओ देखील काढले . सिडनी न्यायालयाने सुनावणीनंतर त्याला दोषी जाहीर केलेले असून त्यानंतर आता या आरोपीचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत इतर भाजप नेत्यांसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे राजकीय कनेक्शन काय आहे याची देखील चर्चा या निमित्ताने सोशल मीडियात जोरदार रंगलेली आहे.

सत्ताधारी भाजप पार्टीला पाठिंबा देणाऱ्या उद्योजकांचा एक समूह त्याने ऑस्ट्रेलियात निर्माण केलेला होता. धनखर हा या समूहाचे नेतृत्व करत होता. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत देखील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर अखेर हे फोटो हटवण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. 2018 मध्ये त्याच्या घरावर छापे टाकल्यानंतर बलात्काराचे तब्बल सतरा व्हिडिओ पोलिसांना सापडून आलेले होते. व्हिडिओमध्ये महिला भयानक स्वप्न पाहत असल्याप्रमाणे ओरडत होत्या त्यानंतर त्याच्या कॉम्प्युटरमध्ये देखील इतरही अश्लील माहिती आढळून आलेली आहे.

आतापर्यंत सिडनी न्यायालयाने त्याला तब्बल 39 गुन्ह्यात दोषी जाहीर केलेले असून त्यात 13 बलात्कार , सहमतीशिवाय एखाद्या महिलेचा व्हिडिओ शूटिंग करणे अशा स्वरूपाची तब्बल 17 प्रकरणे आणि अमली पदार्थाचा वापर करण्याची सहा प्रकरणे आढळून आलेले आहेत. त्याच्यावर कोरियन चित्रपट आणि महिलांचा प्रभाव असल्याचे समोर आलेले असून 2017 मध्ये त्याने महिलांना नोकरी देणारी एक जाहिरात देखील दिलेली होती त्यावेळी तो सिडनी येथे नव्याने आलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि त्यानंतर त्यांचे शोषण करायचा असा प्रकार समोर आलेला आहे.


शेअर करा