बहुमजली इमारतीवर सोडले ‘ चुन चुन के ‘ रॉकेट : पहा व्हिडीओ

शेअर करा

दिवाळीच्या दरम्यान अनेक नागरिकांनी फटाके रॉकेट ॲटम बॉम्ब उडवत दिवाळी साजरी केली मात्र मुंबई किंवा ठाणे येथील एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालेला असून धक्कादायक म्हणजे तो रॉकेट पेटवून एका बिल्डिंगच्या दिशेने उडवत असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे. हातामध्ये एक बॉक्स धरून त्यामध्ये रॉकेट पेटवून हा बिल्डिंगच्या घरांमध्ये सोडत होता. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो हातात रॉकेटचा बॉक्स घेऊन तू रॉकेट पेटवत आहे आणि हे रॉकेट जाणीवपूर्वक तो समोरील बिल्डिंगला जाऊन धडकावे म्हणून प्रयत्न करत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेला असून त्याच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर तरुण कोण होता याचा देखील पोलीस आता शोध घेत आहेत.


शेअर करा