बायकोची साडी फेडली तरी ‘ तो ‘ नाचत होता , गुजरातमधील घटना

शेअर करा

कायदा सुव्यवस्थेचे डांगोरे पिणाऱ्या गुजरातमध्ये अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अक्षरश: तालिबानी पद्धतीने शिक्षा देण्यात आलेली आहे . प्रियकरासोबत पळून गेलेल्या महिलेला ग्रामस्थांनी मारहाण केली आणि त्यावेळी तिचा पती हा चक्क गावकऱ्यांसोबत नाचत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे त्यानंतर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मार्गला गावात ही घटना घडलेली असून गावातील एक महिला काही दिवसांपूर्वी तिच्या प्रियकरासोबत पळून गेलेली होती त्यानंतर ती प्रियकरासोबत पुन्हा गावात आली त्यावेळी गावात मोठा गोंधळ झाला आणि गावकऱ्यांनी ती महिला आणि तिचा प्रियकर यांना गावाच्या मधोमध उभे केले आणि त्यांना बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे काही ग्रामस्थांनी महिलेची साडी देखील खेचून काढली आणि ती साडी प्रियकराच्या डोक्यावर बांधली त्यानंतर या महिलेला संपूर्ण गावात फरफटत नेण्यात आले.

प्रियकरासोबत पळून गेलेल्या आपल्या बायकोसोबत असा प्रकार होत असताना महिलेच्या पतीने देखील या घटनेचे जोरदार सेलिब्रेशन केले आणि तो ग्रामस्थांसोबत नाचू लागला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तीन जणांना अटक केलेली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


शेअर करा