‘ बायकोचे माहेरी जाणे ‘ म्हणजे प्लॅनचाच एक भाग होता , लक्षात आलं तोपर्यंत ..

शेअर करा

एक खळबळजनक अशी घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलेली असून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका महिलेने आपल्या पतीला बेदम मारहाण केलेली आहे. विवाहबाह्य संबंधातून हा प्रकार घडलेला असून महिलेचा पती हॉटेलमधील एका खोलीत दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स करत असताना त्याची पत्नी तिथे पोहोचली आणि तिने पतीला पाहून चक्क चपलेने मारहाण केली. व्हायरल व्हिडिओमध्ये पत्नी पतीसोबत असलेल्या महिलेला देखील चपलेने चोप देते हे देखील दिसून येत आहे. आग्रा येथील दिल्लीगेट परिसरातील हा व्हिडिओ असून सोशल मीडियावर या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दिनेश असे या पतीचे नाव असून तो एका रुग्णालयात काम करतो याचे एका महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा संशय पत्नी नीलम हिला होता. त्यांच्यात वाद सुरू होऊ लागल्यानंतर पती तिला ‘ आपले तसे काहीच प्रकरण सुरू नाही.. ती फक्त मैत्रीण आहे ‘ असे सांगत होता मात्र तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता त्यातून तिने त्याला रंगेहाथ पकडण्यासाठी एक प्लॅन रचला . प्लॅनमध्ये ठरल्याप्रमाणे ती माहेरी निघून गेली . ती आता माहेरी गेली आहे आता आपल्याकडे कुणी येणार नाही असा दिनेशचा विश्वास होता मात्र घरी महिलेला बोलावणे धोकादायक ठरू शकते म्हणून त्याने एका हॉटेलची निवड करत त्याच्या प्रेयसीला तिथे बोलावले.

पत्नीच्या काही गुप्त सूत्रांनी तिला तुझा पती दिल्लीगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत आहे याची खबर दिली त्यानंतर पत्नीने तिचे काही भाऊसोबत घेऊन हॉटेल गाठले त्यावेळी दिनेश दुसऱ्या महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आला आणि त्याला पाहून त्याची पत्नी संतापली आणि तिने पायातली चप्पल काढून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात शेजारी बसलेली त्याची प्रेयसी हिच्यावर देखील महिलेने संताप व्यक्त करत तिला देखील चपलेने चोप दिला.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना आग्रामधील एका हॉटेलमध्ये घडली. एक व्यक्ती बायकोच्या नकळत एका महिलेला डेट करत होता. तिला घेऊन तो हॉटेलच्या रूममध्ये गेला होता. पण बायकोने त्याचा पाठलाग करून त्याला रंगहात पकडलं पण बायको काही ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हती. तिने आपल्या नवऱ्याला चपलेनं मारहाण केली. शिवाय या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर देखील शेअर केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील भडकले आहेत.


शेअर करा