
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात समोर आलेले असून मेदर्गी परिसरात आढळून आलेल्या एका खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आलेले आहे. विवाहबाह्य संबंधातून हे प्रकरण घडलेले असून पोलिसांनी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केलेली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीसोबत आरोपीचे लग्नाच्या आधीपासून संबध असल्याचे देखील समोर आले आहे .
चंदप्पा धर्मण्णा कांबळे , उजवीकडील फोटो ( वय 34 राहणार आंबेवाड तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून सूर्यकांत शरणप्पा कांबळे , डावीकडील फोटो ( राहणार देवंती तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी ) असे अटक केलेल्या संशयित व्यक्तीचे नाव आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात एक मृतदेह आढळून आल्यानंतर बुधवारी दुपारी गुन्हा नोंदवण्यात आलेला होता त्यानंतर पोलीस तपास सुरु असताना ही कारवाई करण्यात आलेली आहे.
चंदप्पा कांबळे आणि त्याची पत्नी सीताबाई यांचा 2008 साली विवाह झालेला होता. दोघेही कर्नाटक जिल्ह्यातील रहिवासी असून ट्रकचालक असलेला संशयित आरोपी सूर्यकांत कांबळे याची आणि सीताबाईची लग्नाआधीच ओळख झाली होती आणि त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू झाले होते .चंदप्पा आणि सीताबाई हे पुणे जिल्ह्यातील यवत येथे कामानिमित्त गेलेले होते त्यानंतर आरोपी सूर्यकांत याने सीताबाईच्या गावचा पाहुणा आहे असे सांगत तिच्या घरात प्रवेश मिळवलेला होता. सूर्यकांत हा पती घरी नसताना अनेकदा सीताबाई हिच्याकडे जायचा आणि त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असायचा.
महिलेच्या पतीला याप्रकरणी खबर लागली आणि त्यानंतर त्याने पत्नीला याबद्दल जाब विचारला त्यातून त्यांच्यात वाद देखील झाले. चंदप्पा याच्यासोबत गावाकडे जाण्याचा आरोपीने प्लॅन केला आणि एका चारचाकी वाहनात चंदप्पा कांबळे याला सोबत घेतले. त्याला इंदापूर येथे दारू पाजली आणि तो गाढ झोपेत असतानाच सूर्यकांत कांबळे यांनी एका लोखंडी हत्याराने त्याच्यावर वार केला त्यामध्ये तो जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. आरोपीने त्यानंतर एका खड्ड्यात त्याचा मृतदेह टाकून देऊन डिझेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र अर्धवट मृतदेह जळालेला असल्याने प्रकरणाला वाचा फुटली आणि त्यानंतर अखेर प्रकरणाचे धागेदोरे सीताबाई आणि तिच्या प्रियकारापर्यंत जाऊन पोहोचले.
पोलिसांनी सीताबाई हिच्याकडे चौकशी केली त्यावेळी तिने आपला पती हा सूर्यकांत याच्यासोबत गेलेला आहे अशी माहिती दिलेली होती त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील हा प्रकार आढळून आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा सखोल तपास केला त्यावेळी सीताबाई आणि सूर्यकांत यांचे लग्नाआधी पासूनच प्रेमसंबंध होते. लग्नाला अनेक वर्ष होऊन गेली तरी त्यांच्या अनैतिक संबंध सुरू होते त्यामध्ये चंदप्पा हा अडथळा ठरत होता असेही समोर आलेले आहे . सूर्यकांत याला खून करण्यासाठी सीताबाई हिने मदत केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश स्वामी पुढील तपास करत आहेत.