बारा वर्षांपासून हातात तिरंगा अन अनवाणी पायपीट , भारत जोडोबद्दल म्हणतोय की..

शेअर करा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिसत असून सोशल मीडियावर सध्या राहुल गांधी यांचा कट्टर समर्थक असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तब्बल बारा वर्षापासून आपण अनवाणी पायाने हातात तिरंगा घेऊन फिरत आहे असे सांगत सर्वाधिक उंचीवर जाऊन तिरंगा फडकवण्याचा आपला मानस आहे असे हा तरुण सांगत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा तरुण त्याचे नाव देखील सांगतो. दिनेश शर्मा असे या युवकाचे नाव असून तो हरियाणा येथील रहिवासी आहे. राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत आपण अनवाणी पायांनी तिरंगा घेत परिक्रमा करत आहोत असे तो व्हिडिओमध्ये सांगत असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा ही हिंदू मुस्लिम सिख ईसाई सर्व धर्मियांना सोबत देणारी यात्रा आहे असे देखील तो सांगतो. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला असून राहुल गांधी यांच्या भारत यात्रेची देखील देशात मोठी चर्चा समाजमाध्यमांवर ( गोदी मीडियात नव्हे ) सुरू झालेली आहे.


शेअर करा