बिकिनी वादात नाक खुपसणे पडले महागात , नेटीझन्सने कुंडलीच काढली

शेअर करा

विवेक अग्निहोत्री

शाहरुख खान याच्या पठाण या चित्रपटात दीपिका पदुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातली म्हणून तिच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. दीपिका पदुकोण हिने जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी भेट दिली होती त्यानंतर तेव्हापासून भाजपशी संबंधित व्यक्तींनी तिच्याविरोधात मोहीम उघडलेली पाहायला मिळत आहे. दीपिका पदुकोण बिकिनी वादात काश्मीर फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील टीका केली मात्र त्यांची ही टीका त्यांच्याच अंगलट आली आहे.

पठाण चित्रपटातील बेशरम गाणे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित केलेले असून त्यामध्ये दीपिका पदुकोन हिने भगव्या रंगाची बिकिनी घातली म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली होती त्यामध्ये त्यांनी बेशरम गाण्याच्या काही क्लिप्स शेअर करत बॉलीवूड चित्रपट आणि ओटीटी कन्टेन्ट यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

आता विवेक अग्निहोत्री यांच्या मुलीचे देखिल बिकिनी घातलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आलेले आहेत. विवेक अग्निहोत्री यांनी आधी स्वतःच्या मुलीला चांगला कन्टेन्ट देण्याची विनंती करावी असा देखील सल्ला त्यांना देण्यात येत आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या लेकीने भगव्या रंगाची बिकिनी घालून स्वतःचे फोटो व्हायरल केलेले आहे त्यामुळे तुम्ही आधी सल्ला आपल्या मुलीला द्या नंतर इतरांचे पहा, अशा देखील खोचक प्रतिक्रिया त्यांना देण्यात येत आहेत त्यानंतर त्यांच्या मुलीने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केलेले आहे.


शेअर करा