
बंगळुरू इथे एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून एका टेक्निशियनने आपल्या दोन वर्षाच्या मुलीची अमानुषपणे हत्या केलेली आहे. मुलीला खायला घालण्यासाठी आपल्याकडे पैसे नव्हते आपण कर्जबाजारी होतो त्यामुळे आपण मुलीच्या हत्या केली असे त्याने सांगितले आहे. त्याने आत्महत्येचा देखील प्रकार केला मात्र त्यात त्याला यश आले नाही.
उपलब्ध माहितीनुसार, राहुल परमार असे आरोपीचे नाव असून तो मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. पोटापाण्यासाठी तो बंगळूर येथे पत्नीसोबत आला होता. मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने त्याने तिला सोबत घेतले आणि एका दुकानातून मुलीसाठी चॉकलेट आणि बिस्किटे घेतली मात्र मुलीला आणखी चॉकलेट आणि बिस्किटे हवी होती त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे त्याने मुलीला मारण्याचा निर्णय घेतला.
मुलीला मारण्याआधी बराच वेळ तिच्या सोबत तो व्हिडिओ गेम खेळत राहिला आणि त्यानंतर तिला मिठी मारून गुदमरून मारून टाकले आणि तिच्यासोबतच तलावात उडी मारली मात्र त्यात त्याला अपयश आले म्हणून बाहेर आल्यावर त्याने ट्रेनला धडकून जीव देण्याचा प्रयत्न केला त्यातही तो बचावला. बिटकॉइन व्यवसायात त्याचे मोठे नुकसान झाले होते त्यातून तो नैराश्यात गेलेला होता असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.