
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अडाणी यांच्यातील कथित संबंधावर जोरदार हल्लाबोल केलेला असून नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी बिनकामाचे सगळे भाषण राज्यसभेत झोडले मात्र अडाणी यांच्याबद्दल एक शब्द देखील उच्चारला नाही. राहुल गांधी यांनी 2014 साली दिल्लीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यानंतर अशी काय जादू झाली की आठ वर्षात गौतम अडाणी हे जगातील 609 नंबर वरील श्रीमंत असताना दोन नंबरपर्यंत त्यांचे प्रगती झाली , असा प्रश्न विचारला होता .
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि अडाणी यांच्यातील कथित संबंधाबद्दल, अडाणी यांच्यासोबत पंतप्रधान मोदी किती वेळा परदेशात गेलेले होते ? परदेशात गेल्यानंतर अडाणी यांनी किती वेळा त्या देशाला भेट दिली ? . तुमच्या भेटीनंतर अवघ्या काही दिवसात अडाणी यांना कंत्राटे कशी मिळत गेली तर गेल्या वीस वर्षात अडाणी यांनी भाजपला किती पैसे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून दिले ? पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला गेल्यावर करार करतात आणि ज्यावर स्टेट बँकेकडून अडाणी समूहाला लगेच एक अब्ज डॉलरचे कर्ज दिले जाते हे भारताचे परराष्ट्र धोरण नसून अडाणीजी यांचे परराष्ट्र धोरण आहे, ‘ असे म्हटलेले होते.
नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे सोडून बिनकामाचा फाफट पसारा आणि इतरांनाच दोष देणे आणि स्वतःचा मी पणा मिरवणे अशाच स्वरूपात भाषण केलेले असून सोशल मीडियावर मोदी यांच्या या भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे तर भाजपकडून नेहमीप्रमाणे राहुल गांधी आणि सोनिया गांधी जामीनवर आहेत . यूपीए सरकारच्या काळात किती घोटाळे झाले ? यावरच अद्याप इतिहासात भाजपाई अडकून पडलेले आहेत . यूपीएच्या काळात घोटाळे दाबण्यासाठी गोदी मीडिया नावाची विकृती माध्यमात नव्हती याचा भाजपला आता सोयीस्कर विसर पडलेला आहे.