
सोशल मीडियावर सध्या तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची जोरदार चर्चा असून बिर्याणी खाल्ल्याने पुरुष नपुंसक होतात या समजुतीतून त्यांनी एक आंदोलन हाती घेतले आणि अनेक बिर्याणी विक्रेत्यांची दुकाने बंद केली. तृणमूल काँग्रेसचे नेते रवींद्रनाथ घोष असे या नेत्याचे नाव असून बिर्याणी बनवताना त्यामध्ये काही पदार्थ मिक्स केले जातात त्यामुळे पुरुषांना नपुसकत्व येते असा त्यांचा आरोप आहे.
रवींद्रनाथ घोष यांनी कूचबिहार मधील विक्रेते बिर्याणी बनवत असताना जे मसाले वापरतात त्या मसाल्याविषयी स्थानिक नागरिकांमध्ये शंका निर्माण होत असून या बिर्याणीमुळे पुरुषांना नपुंसकत्व येते अशी लोकांची समजूत झालेलीआहे तसेच या विक्रेत्यांची दुकाने देखील अनधिकृत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे असे देखील सांगितले आहे. बिर्याणी विक्रेत्यांनी त्यांच्या या आरोपांवर कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही तसेच त्यांच्या विरोधात पोलिसात देखील तक्रार दिली नाही .