बिहारमधील सत्तांतर झोंबले ? लालूप्रसाद यादव यांच्या चौकशीला सुरुवात

शेअर करा

बिहारमध्ये नितीश कुमार तेजस्वी यादव हे एकत्र आल्यानंतर भाजपाला सत्ता गमवावी लागली होती. सीबीआयकडून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख असलेले लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध कथित भ्रष्टाचाराची जुनी प्रकरणे पुन्हा उकरून चौकशीसाठी घेण्यात आलेली आहेत. लालूप्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना झालेल्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरण पुढे आणून त्यात आता चक्क तेजस्वी यादव , लालूप्रसाद यादव यांची मुलगी चंदा यादव आणि रागिनी यादव यांची देखील चौकशी होणार आहे.

लालूप्रसाद यादव यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी असताना हा भ्रष्टाचार झाल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावरील या कारवाईच्या विरोधात बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीने भाजपवर हल्लाबोल केलेला असून केंद्र सरकार सीबीआयसारख्या घटनात्मक संस्थांचा वापर सध्या केवळ सूड घेण्यासाठी करत आहे असे म्हटलेले आहे. लालूप्रसाद यादव सर्व खटल्यातून निर्दोष बाहेर येतील अशी देखील आम्हाला खात्री आहे असे देखील महाआघाडीने म्हटले आहे.


शेअर करा