बेरोजगार तरुणांची हाय अन महागाईचे शिव्याशाप , दोन चमचे ‘ पतंगाली ‘

शेअर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी रोज शिव्या खातो असे वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आणि उलट सुलट प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या . अनेक यूट्यूब चैनलवर त्यांच्या या वक्तव्यावर अनेक व्हिडिओ देखील बनवण्यात आले असाच एक व्हिडिओ युवा देश नावाच्या चैनलवर फेसबुक पेज वर शेअर करण्यात आलेला असून त्यामध्ये पंतप्रधान मोदी आणि पतंजली यांचा वापर करून पतंगाली नावाचे न्यूट्रिशन मार्केटमध्ये आल्याचे सांगण्यात आले आहे.

युवा देश नावाच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला असून त्यामध्ये अक्षय कुमार सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांना लॅपटॉपवर काहीतरी दाखवतो त्यावेळी पंतप्रधान मोदी व्यायाम करताना दिसतात तर दुसरीकडे आपले आरोग्य किती चांगले आहे यासाठी पतंजली नव्हे तर पतंगाली नावाचे न्यूट्रिशन आपण खावे असे आवाहन करताना एक तरुणी दिसते. सदर न्यूट्रिशन हे संपूर्ण शाकाहारी असल्याचे देखील ती सांगते.

देशातील बेरोजगार झालेले युवक, अडाणी यांना एअरपोर्ट विकल्यानंतर एअरपोर्टवरील नागरिक आपल्याला दुषणे देत असतील, महागाईमुळे त्रस्त झालेल्या लोकांची लोकांचे शिव्याशाप आपल्याला लागत असतील तर आपण पतंगाली च्यवनप्राश खावे असे देखील आवाहन ही तरुणी करते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून आतापर्यंत एक लाख लोकांनी हा व्हिडिओ जवळपास पाहिलेला आहे. रोज फक्त दोन चमचे पतंगाली खायचे आणि त्यानंतर दोन ते तीन किलो शिव्या खाण्याची ठाण्याचा आपला स्टॅमिना मॉडीफाय (Modi Fy ) होतो आणि त्याची ऊर्जा निर्माण होते, ‘ असा देखील दावा ही तरुणी करते.


शेअर करा