बौखलाहट गवाह है तानाशाह डरा हुआ है

शेअर करा

आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था अशी ओळख असलेल्या बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयात आयकर विभागाची पथकं दाखल झाली आहेत. आयकरच्या नियमांचं उल्लंघन झाल्याच्या कथित तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी केंद्र सरकार बदल्याच्या भावनेतून ही कारवाई करत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. बीबीसीकडून काही दिवसांपूर्वी मोदी द इंडिया क्वेशन ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि वादात सापडल्यावर त्यावर बंदी देखील घालण्यात आले होती.

बीबीसी हा विदेशी आंतरराष्ट्रीय माध्यमसमूह असून बीबीसीकडून आयकर कायद्याच्या नियमांचा भंग झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक सर्वेक्षण करण्यात करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकरची पथकं धडकली आहेत तर काही कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील बीबीसीच्या बांद्रा कुर्ला येथील कार्यालयात देखील आयकरचं पथक पोहोचलं असून चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे तर दिल्ली येथील काही कर्मचाऱ्यांना लवकर घरी पाठवलं आहे.

काँग्रेने या प्रकरणावर टीका टीका केलेली असून मोदी यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट केला आहे सोबतच ‘ बौखलाहट गवाह है… तानाशाह डरा हुआ है। ‘ असे त्याला कॅप्शन देखील दिलेले आहे सोबतच द वायरचा एका बातमीचा संदर्भ देत गुजरात दंगलीसाठी मोदी डायरेक्ट जबाबदार असल्याचे युकेच्या गोपनीय सरकारी अहवालात म्हटले असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे . मोदी द इंडिया क्वेशन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्यावर बंदी देखील घालण्यात आली होती , असे देखील या व्हिडिओत सांगण्यात येत आहे . सदर व्हिडिओत मोदी ‘ मीडिया ताकतवर नसेल तर लोकतंत्र चालेल कसे ? ‘ असेही म्हणताना दिसून येत आहेत.


शेअर करा