ब्लॅक अँड व्हाईट गाण्यातील प्रियकर प्रेयसीचा ‘ तो ‘ भन्नाट संवाद पुन्हा व्हायरल

शेअर करा

पंतप्रधान मोदी यांचा एक जुना व्हिडिओ असून त्यामध्ये आपण जास्त काही शिकलेलो नाही असे मोदी म्हणताना दिसत आहेत तर दुसरीकडे त्यांची एक डिग्री सोशल मीडियात व्हायरल झालेली आहे त्यामध्ये डिग्री सर्टिफिकेटमध्ये वापरलेला फॉन्ट हा मोदी यांना डिग्री दिल्यानंतर पाच वर्षांनी बनवला गेलेला होता हे समोर आलेले आहे त्यामुळे सोशल मीडियात मोदी यांच्या शिक्षणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मोदी यांची इंग्रजी अगदीच दुय्यम असल्याचे देखील अनेकदा दिसून आलेले असून नेहमीप्रमाणे ‘ राष्ट्रवाद अन भाषाभिमान ‘ नावाखाली हा प्रकार खपवला जात आहे.

सदर पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून एका हिंदी चित्रपटातील हे गाणे आहे यामध्ये प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात डिग्रीवरून होणारा संवाद एका गाण्याच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. जुन्या काळातील ब्लॅक अँड व्हाईट गाणे पुन्हा एकदा सोशल मीडियात चर्चेत आलेले असून काँग्रेसचे नेते कृष्णा अल्लावरू यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे.

गाण्यामध्ये प्रेयसी तिच्या प्रियकराला बीए पास करून मला डिग्री दाखव असे म्हणते त्यावर तो खिशातून डिग्री काढून तिला ही डिग्री आहे असे दाखवतो . प्रेयसी त्याची डिग्री पाहून प्रेयसी तुझा ४२० पणा कुणा इतर व्यक्तीला दाखव असे म्हणते आणि त्याची डिग्री फाडून टाकते आणि त्याला ही डिग्री कचऱ्यात फेकण्याचा सल्ला देते . सदर व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


शेअर करा