भररस्त्यात अल्पवयीन मुलीसोबत अत्याचाराचा प्रयत्न , मुलीच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीत …

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण छत्रपती संभाजीनगर इथे समोर आलेले असून सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तिची छेड काढत तिचा विनयभंग केल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र याचवेळी मुलीचे आई-वडील तिथे आले आणि त्यांनी या तरुणाच्या तावडीतून तिची सुटका केली. यावेळी मुलीच्या वडिलांनी आरोपी तरुणांच्या डोक्यात फावड्याने मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे . कन्नड तालुक्यातील जवखेडा बुद्रुक येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी संध्याकाळी पाच वाजता रस्त्याने जात असताना सतीश सुरेश शिखरे नावाचा तीस वर्षांचा तरुण तिला आडवा आला आणि त्याने तिचा भररस्त्यात विनयभंग केला त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा देखील प्रयत्न केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर तिचे आई-वडील तिच्या मदतीला धावले. भररस्त्यात हा प्रकार घडल्याने वडील प्रचंड संतापले आणि त्यांनी लाकडी फावड्याने त्याच्या डोक्यात मारले.

आरोपी सतीश हा रक्तबंबळ झाला त्यानंतर त्याला तात्काळ पिशोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती सुधारत नसल्याने त्याला घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे त्याचा शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास मृत्यू झालेला आहे. मयत आरोपी सतीश शिखरे याच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे या प्रकरणातील अल्पवयीन मुलीचे वडील यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्या विरोधात सतीश याच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.


शेअर करा