
देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून मध्यप्रदेशातील छत्रपूर जिल्ह्यात ही घटना समोर आलेली आहे. उधा अहिरवार नावाच्या एका व्यक्तीला पत्नीसोबत चक्क दोन दिवस बेड्या घालून झाडाला बांधून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे . सदर दांपत्य हे वृद्ध असून त्यांची पत्नी पतीला सोडण्याची विनंती करत होती मात्र कुणीही त्यांची मुक्तता केली नाही. दोन दिवसांनी आरोपींनी त्यांची सुटका केली त्यानंतर उधा घरी आले आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
उपलब्ध माहितीनुसार, मयत व्यक्ती उधा अहिरवार यांचा मुलगा शंकर अहिरवार हा राजस्थान इथे मजुरीचे काम करत असून त्याने परिसरातील एका मुलीसोबत पळून जाऊन लग्न केलेले आहे त्यामुळे मुलीचे वडील संतापले आणि मुलगा शंकर सापडत नसल्याने त्याच्या वडिलांना आणि आईला उचलून पंचमपुर गावात आले . तिथे मुलीचे वडील कल्याण आणि पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण केली त्यानंतर अखेर दोन दिवसांनी आरोपींनी त्यांची सुटका केली मात्र त्यांनी घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असून आता गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
त्यांची पत्नी असलेल्या सावित्री यांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर हत्येचा आरोप केलेला असून तब्बल दोन दिवस भर रस्त्यावर झाडाला बांधून हा प्रकार सुरू असल्याकारणाने मोठ्या प्रमाणात त्यांची बदनामी झाली म्हणून शरमेने त्यांनी आत्महत्या केली असे म्हटले आहे. पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला असून झाडाला बांधलेल्या असह्य अवस्थेत पत्नी जेवण भरवत असल्याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेला असून या व्हिडिओबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे .