‘ भसाडा आवाज ‘ पासून गाणे बंद करा , अमृता फडणवीस निशाण्यावर

शेअर करा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मूड बना लिया हे गाणे रिलीज केले होते या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला मात्र त्यानंतर त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आणखीन एक नवीन गाणे प्रदर्शित केले मात्र त्यानंतर त्यांना अनेक उलट प्रतिक्रिया या संदर्भात येऊ लागल्या आहेत.

सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणे अमृता फडणवीस यांच्या आवाजात प्रदर्शित झाले. या गाण्यासोबत अनेक भारतीयांच्या भावना जोडलेल्या असल्या कारणाने या गाण्याला अमृता फडणवीस यांचा आवाज सुट झाला नाही आणि त्यानंतर या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केल्यानंतर नेटिझन्स चांगलेच भडकले.

अमृता फडणवीस यांच्या आवाजाला ‘ भसाडा आवाज ‘ इथपासून तर ‘ तुम्ही गाणे बंद करा ‘ इथपर्यंत अनेक सल्ले देण्यात आलेले असून तुमचे हे गाणे म्हणजे मराठी माणसांवर अत्याचार आहे. अल्बम करून कोणी स्टार होत नाही. तुम्ही असे गाणे गाऊ पण नका तुम्हाला जमत नाही, देशाचा अपमान होईल असा तुमचा आवाज आहे अशा देखील अनेक कमेंट त्यांच्या या गाण्यावर येत आहेत.


शेअर करा