भाजपकडे आता मुद्देच राहिले नाहीत म्हणून .. , प्राजक्तदादांनी खडसावलं

शेअर करा

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला असून राज्यात एक वर्षापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. चार-पाच खाते एका एका मंत्र्याकडे असल्याने जनतेची कामे रेंगाळलेली आहेत. सध्याचे खोके सरकार हे पळून गेलेल्या चाळीस आमदारांना सांभाळण्यातच व्यस्त आहे. त्यांना जनतेच्या समस्याचे काही घेणेदेणे राहिलेले नाही. विजेचा प्रश्न वाढलेला आहे. रोहित्र जळाले तरी रोहित दुरुस्त केले जात नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे.

आमदार प्राजक्त तनपुरे हे राहुरी खुर्द येथील मुळा पाटबंधारे वसाहतीतील रस्त्याच्या कामाच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते. ते म्हणाले की , ‘ केंद्र सरकार महागाई बेरोजगारी या प्रश्नावर फेल ठरलेले असून साडेचारशे रुपयांचा गॅस आता बाराशे रुपयांवर पोहोचलेला आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठलेला असून यापुढील निवडणुकीत भाजपकडे कोणतेही मुद्दे नाहीत म्हणून केवळ धार्मिक तेढ निर्माण करून भावनिक मुद्द्यावर जनतेला मते मागण्याचा त्यांचा फंडा आहे अशा व्यक्तींपासून जनतेने सावध राहण्याची गरज आहे.

प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की , ‘ मागील वर्षी सततच्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकरी एक वर्षापासून मदतीची वाट पाहत आहेत. आघाडी सरकारच्या काळात केलेले सुरू केलेले आरडगाव येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाचे काम या सरकारमुळे रखडलेले आहे . खिळखिळ्या झालेल्या एसटीवर गतिमान शासन अशी जाहिरात करून शासन गतिमान होत नाही ‘ असा देखील टोला त्यांनी लगावलेला आहे .


शेअर करा