भाजपच्या महिला नेत्याला बनायचंय ‘ गँगस्टर ‘ , प्रियकरासोबतच राहून..

शेअर करा

भाजपच्या गोटातील अभिनेत्री कंगना राणावत हिने आपल्या घरात कोणी अनधिकृत प्रवेश करण्यात आला तर गोळ्या घालण्यात येतील असा एक बोर्ड तिच्या घरामध्ये लावलेला आहे. बिहारची राजधानी पाटणा इथे याही पेक्षा वेगळा एक प्रकार समोर आलेला असून भाजप नेत्या श्वेता झा यांनी गँगस्टर बनण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांचे पती चंदन कुमार झा यांनी हा दावा केलेला असून श्वेता झा या मिसेस इंडिया किताब जिंकलेल्या देखील महिला आहेत.

श्वेता झा हिचे काही व्हायरल व्हिडिओ झालेले असून त्यामध्ये ती एके 47 राइफल पकडून ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे याआधी देखील तिच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने देखील त्यांची चौकशी सुरू केलेली होती मात्र चौकशी झाल्यावर ती घरी परतलीच नाही.

श्वेता झा यांचे पती असलेले चंदन झा यांनी म्हटल्याप्रमाणे ,’ आपण स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर असून पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर श्वेता झा घरी परतलेली नाही. ती तिचा प्रियकर असलेला अभिषेक याच्यासोबत राहत असून महापौरपदाची निवडणूक हरल्यानंतर तिने आता गँगस्टर बनण्याचे ठरवलेले आहे त्यासाठी मला शस्त्र मिळवून दे अशी ती मला म्हणत होती मात्र आपण यासंबंधी असमर्थता दर्शवली त्यानंतर ती प्रियकराच्या नादी लागली आणि ती आता सध्या घरी देखील येत नाही ,’ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. श्वेता झा हिच्याकडे एके 47 रायफल कुठून आली असा देखील प्रश्न आता सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.


शेअर करा