भाजपमध्ये खळबळ..अयोध्येच्या पुजाऱ्यांचे राहुल गांधींना आशीर्वाद

शेअर करा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून सुरुवातीला ही यात्रा अवघे काही दिवस चालेल असा दावा भाजपकडून करण्यात येत होता मात्र यात्रा काही थांबण्याचे नाव घेत नाही. सुरुवातीला या यात्रेला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर यात्रेची बदनामी देखील करण्यात आली मात्र भाजपच्या कुठल्याच डावपेजाला यात्रेने दाद दिली नाही आणि ही यात्रा आता उत्तर प्रदेशात दाखल झालेली आहे.

उत्तर प्रदेशात यात्रा दाखल झाल्यानंतर श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे मुख्य पुजारी असलेले आचार्य श्री सत्येन्द्र दास जी महाराज यांनी राहुल गांधी यांना यात्रेसाठी आशीर्वाद दिले असून त्यामध्ये भारत जोडो याचा मंगलमय व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे . भारत देश जोडण्यासाठी आपण जी तपस्या करत आहात त्यामध्ये आपल्याला सफलता मिळावी. आपण स्वस्त रहावे आणि दीर्घायू राहावे यासाठी देखील त्यांनी कामना केली आहे.

देशासाठी आपण जे काही करत आहात ते सर्वांच्या हिताचे आहे त्यामुळे आपल्याला या मंगल कामी माझे आशीर्वाद देतो असे देखील त्यांनी म्हटले आहे. भाजपच्या जवळच्या श्रीराम जन्मभूमीच्या पुजाऱ्यांनी चक्क राहुल गांधी यांना आशीर्वाद दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचा देखील उत्साह दुणावला पाहायला मिळत आहे तर भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे.


शेअर करा