भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शेअर करा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इथे बोलताना ‘ मी गद्दारांवर बोलण्यासाठी आलेलो नाही. तुम्हीच आता ठरवा गद्दारांचे काय करायचे ते ? ‘ असे म्हणत भाजपने घराणेशाहीवर बोलण्याआधी स्वतःची दोस्तशाही संपवावी. लोकसभा निवडणुक मोदींविरोधात नसून लोकशाही संपवणाऱ्यांच्या विरोधात आहे असे म्हटलेले आहे.

हिंगोली इथे रामलीला मैदानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ मी गद्दारांविषयी बोलण्यासाठी इथे आलेलो नाही. गद्दाराला नाग समजून दूध पाजले. पूजा केली मात्र त्याने उलट डंख मारण्याचे काम केले. नावात हिंदुत्व आणि धंदे मात्र अवैध हा कसला हिंदुत्ववाद ? मी मुख्यमंत्री असताना सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. सरकार आपल्या दारी थापा मारतो भारी ‘ असे म्हणत गद्दारीसोबतच आता सुलतानी संकट देखील राज्यासमोर असल्याचे त्यांनी म्हटलेले आहे.

भाजपचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ भाजपमध्ये सध्या निष्ठावंत व्यक्तींना सतरंज्या उचलण्याचे काम तर त्या सतरंज्यावर नाचण्याचे काम उपरी व्यक्ती करत आहेत. सत्ता आल्यानंतर भाजपमध्ये हे उपरे दाखल झालेले असून देशात इंडियाची एकजूट पाहून पंतप्रधान यांची बोलण्याची पातळी घसरलेली पाहायला मिळत आहे . इंडियाला ते घमंडीया असे म्हणत असून घराणेशाहीवर बोलणाऱ्या भाजपने आधी त्यांच्या पक्षातील दोस्तशाही संपवावी . राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार हे खोक्यातून जन्मलेले सरकार असून आमच्यामधून नालायक माणसे चोरून नेण्याचे काम त्यांनी केलेले आहे ‘, असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा