भाजपा भूषण ‘ ब्रिजभूषण ‘ यांच्यावरील प्रेमापोटी भारतीय कुस्ती महासंघाला झटका

शेअर करा

महिला कुस्तीपटू यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणावरून जोरदार आंदोलन केले होते अर्थातच गोदी मीडियाने महिला खेळाडूंनाच बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर जागतिक पातळीवर देखील या आंदोलनाची चर्चा झाली त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाला सदस्यता रद्द करण्याचा इशारा देखील युनायटेड वर्ल्ड रेस्टलिंगने दिलेला होता मात्र केंद्र सरकारने ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही सोबतच अंतर्गत निवडणूक देखील घेतलेली नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे .

काही दिवसांपूर्वी ब्रिजभूषण शरण सिंह यांनी बोलताना ,’ जगात दोनच प्रेमी होऊन गेले एक शहाजहान आणि दुसरा मी ‘ असे देखील वक्तव्य केलेले होते . भारतीय कुस्ती महासंघाकडून तसेच केंद्र सरकारकडून लैंगिक शोषणाचे आरोपी असलेले ब्रिजभूषण शरणसिंह यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता जागतिक पातळीवर अखेर रद्द करण्याची घोषणा करण्यात आलेली असून जागतिक पातळीवर आता भारतीय कुस्ती संघ खेळू शकणार नाही मात्र गोदी मीडियामध्ये याबाबत पूर्णपणे शांतता पाहायला मिळत आहे.


शेअर करा