भाजप खासदार असूनही मुलाला वाचवू शकलो नाही म्हणून..

शेअर करा

सध्या तरुणांमध्ये व्यसनाची क्रेझ असून त्यामध्ये काही तरुण दारू देखील प्राशन करतात मात्र त्यातून भावी आयुष्यात त्यांना अनंत अडचणी देखील निर्माण होतात. केंद्रीय गृहनिर्माण राज्यमंत्री कौशल किशोर यांनी याप्रकरणी भाष्य करताना, ‘ मी माझ्या मुलाला दारूपासून वाचवू शकलो नाही. दारूच्या व्यसनापायी त्याचा मृत्यू झाला आमच्या कुटुंबातील हा अनुभव लोकांनी लक्षात घ्यावा आणि दारूचे व्यसन असलेल्या तरुणांशी आपल्या मुलीचा विवाह करू नये, ‘ असे म्हटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना कौशल किशोर म्हणाले की, ‘ दारूचे व्यसन असणाऱ्या सरकारी अधिकार्‍यापेक्षा निर्व्यसनी असलेला एखादा रिक्षाचालक किंवा मजूर हा देखील चांगला जीवनसाथी ठरू शकतो. दारू पिणारा माणूस खूप कमी काळ जगतो हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. माझ्या मुलाला किशोरला त्याच्या मित्रांमुळे दारूचे व्यसन लागले. मी स्वतः खासदार आणि माझी पत्नी आमदार असून देखील आम्ही त्याला वाचवू शकलो नाही तर सर्वसामान्य माणसांचे किती हाल असतील याचा देखील विचार करा .’

आपल्या मुलाबद्दल बोलताना कार्यक्रमात कौशल किशोर हे भाऊक झाले होते त्यावेळी ते म्हणाले की, ‘ माझा मुलगा याला दारुचे व्यसन लागल्यावर त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले मात्र तो तिथे राहिला नाही त्यानंतर त्याचे लग्न लावून दिले मात्र लग्नानंतर तो दारू प्यायला लागला आणि अवघ्या दोन वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचा मुलगा फक्त दोन वर्षांचा होता. आम्ही स्वतः खासदार आणि आमदार असूनही मुलाला वाचू शकलो नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी लग्न करताना तरुणाची व्यवस्थित माहिती घेऊनच लग्न करावे , ‘ असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा