
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नागपूर इथे समोर आलेली असून बँकेच्या संचालक मंडळाने भ्रष्टाचाराचे आरोप लावून आपल्याला गुन्ह्यात अडकवलेले आहे असा आरोप करत अकोला जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेच्या संचालक असलेल्या व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली पुढे घेऊन आत्महत्या केलेली आहे. नागपूर येथे ही घटना घडलेली असून सदर व्यक्ती यांची पत्नी भारतीय जनता पार्टीमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, अविनाश मनतकार ( वय साठ राहणार तेलारा जिल्हा अकोला ) असे मत व्यक्तींचे नाव असून त्यांच्या पत्नी ह्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आहेत. सदर प्रकरणामुळे आपले वडील खचून गेलेले होते असे त्यांच्या मुलाने सांगितलेले असून या प्रकरणात ससेमीरा पाठी लागल्यानंतर त्यांना चक्क त्यांचा पेट्रोलपंप देखील विकावा लागला होता असे म्हटलेले आहे.
अविनाश मनतकार यांनी मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली असून त्यामध्ये , ‘ मलकापूर अर्बन बँकेचे चैनसुख संचेती, उपाध्यक्ष लखानी यांनी स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी आमच्या नावावर हा भ्रष्टाचार लावला आणि आम्हा पती-पत्नीला फसवले संचालक मंडळ दोषी आहे की नाही याची पोलिसांनी देखील चौकशी केली नाही. संचेती आणि लखानी यांनी दिलेल्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत आहोत ‘ असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेले आहे सोबतच याप्रकरणी रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी तब्बल 38 लाख रुपये घेतल्याचे देखील त्यांनी लिहून ठेवलेले असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे तर दुसरीकडे संचेती आणि लखानी यांनी आरोप फेटाळले असून कारवाई होण्यास घाबरून हे कृत्य केले आहे असे म्हटले आहे.