भारताशेजारच्या देशात आता ‘ ब्युटी पार्लर ‘ ला बंदी , सुंदर दिसाल तर.. 

शेअर करा

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या शोषणाच्या नवनवीन घटना समोर येत असून अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ब्युटी पार्लरवर बंदी आणलेली आहे. महिलांना व्यवसाय बंद करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. तालिबानने याआधी देखील अफगाणिस्तान येथील अनेक महिला युट्युबरला छळण्यास सुरू केलेले होते त्यानंतर अनेक महिला युट्युबरने व्हिडिओ बनवणे बंद केलेले आहे. 

अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या अधिकारावर आता हे नव्याने बंधन टाकण्यात आलेले असून यापूर्वीच त्यांना शिक्षण आणि बहुतांश ठिकाणी नोकऱ्या करण्यास देखील बंदी घालण्यात आलेली आहे. तालिबान सरकारचे प्रवक्ते मोहम्मद सिद्दीक अखीब महाजन यांनी बंदी का घातलेली आहे ? याचा तपशील दिलेला नाही. 

तालिबानच्या मंत्रालयाने एक प्रसिद्ध पत्रक दिलेले असून त्यामध्ये सर्वोच्च नेते हीबातुल्लाह अखिबजादा यांच्याकडून आदेश देण्यात आलेला असून राजधानी काबुल आणि सर्व प्रांतांमध्ये आता ब्युटी पार्लरला बंदी राहणार आहे. सर्व महिलांना व्यवसाय बंद करण्यासाठी एक महिन्याची नोटीस देण्यात आलेली आहे. जर हे व्यवसाय बंद झाले नाही तर सरकार व्यवसाय बंद करणार आहे. महिलांचे जीवन सुधारण्यासाठी यापुढे आवश्यक पावले उचलली जातील असा देखील अजब दावा त्यांनी या पत्रात केलेला आहे. 


शेअर करा