
वादग्रस्त चित्रपट समीक्षक असलेला आणि अभिनेता कमाल रशीद खान अर्थात के आर के याने भारतातील सर्व मुस्लिमांना धर्मांतर करण्याचा सल्ला दिलेला असून सातत्याने तो त्याच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी त्याचे ट्विटर अकाउंट देखील बंद करण्यात आलेले होते त्यावेळी त्याने आत्महत्या करण्याची देखील धमकी दिलेली होती . सद्य परिस्थितीत त्याचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले असून आपल्या कुटुंबासाठी मुस्लिमांनी धर्मांतर करून हिंदू होणं हा चांगला पर्याय आहे असे त्याने म्हटलेले आहे.

के आर के म्हणतो की , ‘ मी भारतातील सर्व मुस्लिमांना सुचवू इच्छितो की धर्मांतर करून हिंदू बनणे चांगले आहे कारण आपल्या कुटुंबाचे आयुष्य आणि आपली मुलं ही धर्मापेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. आम्ही भारतीय मुस्लिमांनी अरबांसाठी धर्मांतर केले पण अरब देश इस्लामचे रक्षण करण्यास तयार नाहीत त्यामुळे आपले कुटुंब वाचवण्यासाठी पुन्हा धर्मांतर करण्यात काहीच गैर नाही , ‘ असे देखील तो पुढे म्हणतो. त्याच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.