‘ भारत जोडो ‘ यात्रा दुसरा स्वातंत्र्यलढा , आपणही असे होऊ शकता सहभागी

शेअर करा

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा भाजपने चांगलाच धसका घेतलेला असून नेहमीप्रमाणे राहुल गांधी यांच्या जनतेशी संबंधित अशा प्रश्नांना देखील योग्य ती उत्तरे न देता थिल्लर स्वरूपाची टीका भाजपकडून सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात देखील नांदेड इथे नोव्हेंबर महिन्यात या यात्रेचे आगमन होणार असून काँग्रेस नेत्यांनी यात्रा मार्गाची पाहणी करून रविवारी पत्रकारांशी संवाद साधला होता. आपल्याला देखील भारत जोडो यात्रेत सहभागी व्हायचे असेल तर 99 999 80 200 नंबरवर एक मिस कॉल द्या त्यानंतर आपल्याला टीमकडून संपर्क करण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे किंवा https://www.bharatjodoyatra.in/ या वेबसाईटवर देखील आपण आपले नाव आणि माहिती आपण नोंदवू शकता.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह राहुल गांधी मुक्काम करणार असलेल्या ठिकाणांची पाहणी केली त्यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘ विविधतेने नटलेल्या भारतासाठी भारत जोडो यात्रा असून एक प्रकारे हा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे ‘ असे म्हटलेले आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘ आमचा वंदे मातरमला विरोध नाही. आपला देश कृषीप्रधान आहे त्यामुळे अन्नदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनांनी जय बळीराजा, राम राम म्हणावे अशी देखील आमची भूमिका आहे. भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .भाजपचे नेते हादरून गेलेले आहेत अन त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असून याच त्यामुळेच ते निराश मानसिकतेतून राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहे, असे म्हटले आहे.

मुसळधार पावसात जोरदार भाषण केल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभण्यास सुरुवात झालेली असून जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी गोदी मिडीयाने मान टाकलेली आहे अशा परिस्थितीत रस्त्यावर उतरून राहुल गांधी भाजपला खुले आव्हान देत आहेत. देशातील महागाई बेरोजगारी आणि द्वेषाचे वातावरण याच्या विरोधात राहुल गांधी रस्त्यावर असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यादेखील सहा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.

सोनिया गांधी यांचा यात्रेतील सहभाग हा काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारा ठरणार असून भाजपच्या विरोधात देशभरात कॉंग्रेससह अनेक नागरिक देखील एकवटलेले पाहायला मिळत आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे नागरिक हैराण झालेले असताना गोदी मीडिया आणि भाजपच्या नेत्यांना हे सत्य मान्य करण्यास अडचण येते कारण मान्य केल्यानंतर जबाबदारी घेण्याचे देखील काम अंगावर येऊन पडते म्हणून महागाई आणि बेरोजगारी आहे हे भाजपचे नेते मान्यच करत नाही असेही अनेकदा समोर आले आहे.


शेअर करा