भावासाठी तुझ्यासाठी काय पण.. बहिणीचा ‘ इतका ‘ मोठा निर्णय की..

शेअर करा

एकीकडे रक्ताची नाती परकी होत असतानाच अशा व्यक्तींच्या डोळ्यात अंजन घालणारी एक बातमी बंगळूर इथे समोर आलेली असून एका बहिणीने चक्क आपल्या भावाला वाचवण्यासाठी तिच्या लिव्हरचा 68% भाग दान केलेला आहे. गुरदीप कौर असे या बहिणीचे नाव असून आपल्या भावाला नवीन आयुष्य देण्यासाठी तिने चक्क स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली आहे.

सदर प्रकरणी बोलताना गुरुदीप कौर यांनी म्हटले आहे की, ‘ आपले अवयव दान करणे पूर्णपणे योग्य असून यकृत प्रत्यारोपण केल्याशिवाय माझा भाऊ वाचणार नाही याची मला पूर्णपणे माहिती होती त्यामुळे मी पूर्णपणे शुद्धीत आणि हिमतीवर भावाला नवजीवन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला दोन मुले आणि पती असून देखील त्यांच्या संमतीने माझ्या भावाला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे ‘ असे म्हटलेले आहे.

2021 मध्ये दुबई येथील गुरुदीप यांचा भाऊ जसवंतसिंग याला सौम्य ताप आलेला होता आणि त्यानंतर त्याचे डोळे पिवळे पडले. त्याला कावीळ झाली असावी असा विचार करून ते डॉक्टरांकडे गेले मात्र त्यानंतर अखेर फरक पडला नसल्याने त्याला पुन्हा भारतात आणण्यात आले. त्याची प्रकृती सतत खालावत गेली आणि अखेर डॉक्टरांनी त्याला यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे सांगितले.

गुरदीप सासरहून आपल्या माहेरी आल्या आणि त्यानंतर डॉक्टरांशी सल्लामसलत केली त्यावेळी डॉक्टरांनी आई वयस्कर असल्या कारणाने त्यांचे यकृत जसवंत सिंग यांना चालणार नाही तसेच मुलांची यकृत जुळत नाहीत असे सांगितल्याने अखेर गुरदीप यांनी भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे यकृत देण्याचा निर्णय घेतला आणि अखेर यकृत प्रत्यारोपण पार पडले. आपण आपल्या भावासाठी घेतलेल्या या निर्णयाचा आपल्याला अभिमान असून आपल्यामुळे आपला भाऊ वाचला असे म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे.


शेअर करा